मुंबई: हार्दिक पंड्या हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. आणि त्याने टीम इंडियासाठी केलेल्या कामगिरीद्वारे त्याला लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळवून दिला आहे. आता गुजरातचे कर्णधारपद भूषवत या संघाला चॅम्पियन बनवत त्याने लोकांच्या हृदयात आपले स्थान अधिक घट्ट केले आहे. आयपीएलपूर्वी खराब फिटनेसशी झुंज देत असलेल्या हार्दिकने ज्या प्रकारे पुनरागमन केले ते आश्चर्यकारक आहे. त्याने आयपीएलच्या या मोसमात कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले आणि अष्टपैलू म्हणूनही त्याची जुनी प्रतिमा पुन्हा मिळवली. काल खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरात संघाने राजस्थानला ७ गडी राखून पराभुत केले. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या गुजरातने थेट विजेतेपदाला गवसणी घातली.
हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये आपल्या संघासाठी चमकदार अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले आहे. त्याच्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याचे जोरदार कौतुक केले. हार्दिक पंड्याने या मोसमात खेळल्या गेलेल्या १५ सामन्यात ४८७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ८ बळीही घेतले. यातील त्याने ३ बळी तर अंतिम सामन्यात घेतले.
सेहवागने भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याचे मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे अप्रासंगिक का आहे हे स्पष्ट केले. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, की मैदानाबाहेरील व्यक्तिमत्वाचा काही फरक पडत नाही. ते पूर्णपणे अप्रासंगिक आहे कारण त्याचा मैदानावर परिणाम होत नाही. या मोसमात हार्दिक पंड्या तिन्ही विभागात दमदार कामगिरी करताना दिसत होता. लोक पंड्यावर प्रेम करतात कारण तो मैदानात नेहमीच दमदार कामगिरी करत असतो.
सेहवागने गुजरात टायटन्स फ्रेंचायझीच्या कोचिंग स्टाफचेही कौतुक केले. सेहवाग म्हणाला, असे नाही की गुजरात संघामध्ये स्टार-स्टडेड कोचिंग स्टाफ होता. गॅरी कर्स्टन हेच सर्वात तुलनेने अननुभवी होता. पण, त्यांनी आपली भूमिका खूप छान वठवली. त्यांनी खेळाडूंना खरोखर चांगले समर्थन दिले आहे आणि त्यांना हवे ते दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:


