जालना: सध्या सगळीकडेच लसीकरण सुरु आहे. शहर तसेच ग्रामीण भागात देखील नागरिक लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोना होऊ नये या भीतीने सर्वच जण लस घेण्यास पुढे येत आहेत. मात्र लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये या साठी काही नियम लागू करण्यात आले आहेत मात्र नागरिक हे नियम पाळताना दिसत नाहीये. लस घेण्यासाठी आलेल्यांना कदाचित एवढ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्याता नाकारता येत नाही.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असून कोणत्याही प्रकारे कोरोना निर्बंध पाळले जात नसल्याने डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे भयंकर रूप आपल्या जिवावर बेतू शकते हे आता नागरिकांना चांगलेच कळायला लागल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आता मोठी गर्दी उसळली आहे.
जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालय, टेंभुर्णी, वरुड बु, खासगाव, माहोरा, डोणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रावर लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर लस घेण्यासाठी उसळलेली तोबा गर्दी पाहून आता बंदोबस्त ठेवायची वेळ येऊन ठेपली आहे. प्रशासन योग्य त्या सूचना देते. काळजी घेण्याचे आवाहन करते. परंतु त्याकडे नागरिकच दुर्लक्ष करतात. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने मृत्युदर वाढला आहे त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यामुळे सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे असे आवाहन प्रशासन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यातील ‘हे’ गाव ठरतंय कोरोनाचे हॉटस्पॉट!
- विनाकारण फिरणाऱ्याला होणार 500 रूपये दंड, वापरलेले वाहनही पोलीस घेणार ताब्यात
- मानवी स्वभावाची संवेदनशील नात्याची गोष्ट सांगणारा ‘जुन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- ७२ हजार रिक्त पदांची रखडलेली मेगा नोकरभरती मार्गी लागणार
- खतांच्या वाढत्या किंमती विरोधात बच्चू कडू आक्रमक, ताली थाली बजाव आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

