🕒 1 min read
नागपूर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज कॉंग्रेस स्वबळावर लढणार, असा दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कानपिचक्या दिल्या नंतर देखील पटोले यांनी २०२४ पर्यन्त कॉंग्रेसला एक नंबरचा पक्ष करू, अशी गर्जना केली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी नाना पटोले स्वबळाची हाक देण्याचे थांबत नाहीत.
यावरून आता भाजप नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर तोफ डागली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, असा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून दिल्याचेही सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात खळबळ वगैरे काही नाही, तिन्ही पक्ष मिळून चांगली नौटंकी करत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. या सरकारमधील एकही जण विकासाची भाषा करताना दिसत नाही. पण दररोज नवीन नवीन भानगडी मात्र करत असतात, एकाही नेत्याला विकासाचे व्हिजन नाही. विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून ठेवले, महाराष्ट्र विकास मंडळ बंद केले, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तर, नाना पटोले काही म्हणतात आणि कॉंग्रेसचे नेते शरद पवारांकडे जाऊन बैठक घेतात. तिकडे मुख्यमंत्र्यांकडे वेगळी बैठक तर उपमुख्यमंत्र्यांच्या वेगळ्याच बैठकी सुरू असतात. मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला जेवायला बोलवा. हे काय चालले आहे महाराष्ट्रात. निव्वळ राजकारण सुरू आहे. इकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना यांच्या आपसातल्याच भानगडी संपत नाहीये. हे सर्व निवडणुकीच्या वेळी त्यांनी करावे. पण आता काम करण्याची वेळ आहे, तर जनतेसाठी ठोस काम त्यांनी करावे, अशा प्रकारे टाईमपास करू नये, असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- रावसाहेब दानवेंची घोषणा ; गणेशोत्सावात कोकणात जाणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा,आम्ही स्वबळावर जेवायला येऊ : मुख्यमंत्री
- ‘बळ-बळ करणा-या महाविकास आघाडीला जनताच पळ काढायला लावेल’
- ‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेची सेटिंग’ ; भाजपचा आरोप
- डिझेलच्या ठणठणाटामुळे एसटी कर्मचारी संकटात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
