मुंबई : आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गोव्यामध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. व त्यांनी आज पुन्हा एकदा विजेच्या हमीचे आश्वासन दिले. पंजाब आणि उत्तराखंडानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता गोव्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार बनल्यास ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. यासह त्यांनी सर्व जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासनही दिले आहे.
भरमसाठ रक्कमेची जुनी बिले माफ केली जातील, चोवीस तास अखंडित वीज पुरवठा केला जाईल तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, अशा घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले कि, ‘दिल्लीत लोकांना मोफत वीज मिळू शकते तर गोव्यात का नाही? गोव्यात अतिरिक्त वीज आहे. परंतु वहन आणि वितरण व्यवस्था सदोष आहे. ती सुधारून अखंडित चोवीस तास वीज पुरवठा केला जाईल.
दिल्लीत आज ७३ टक्के लोक मोफत विजेचा लाभ घेत आहेत. आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास गोव्यात ८७ टक्के लोकांना मोफत वीज मिळेल. ‘ असे आश्वासन त्यांनी गोवावासियांना यावेळी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या पत्नीला ईडीचं समन्स; उद्या हजर राहण्याचा आदेश
- झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप?
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
