Share

अनिल देशमुखांच्या पत्नीला ईडीचं समन्स; उद्या हजर राहण्याचा आदेश

Published On: 

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता देशमुख यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरं गेलेलं नाही.

दरम्यान, अनिल देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आरती देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं. त्यांना गुरूवारी ईडी कार्यालयात बोलवण्यात आलं आहे तिथे त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. याआधी हृशिकेश देशमुखला समन्स बजावण्यात आलं होतं.

आम्ही ईडीला सांगितलं आहे की आरती देशमुख यांचा मनी लाँड्रीग प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र तरीही ईडीने आरती देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीचं हे संपूर्ण प्रकरण सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबावर आधारीत आहे. माजी एपीआय सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. मात्र सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांना दिलेला जबाब वेगळा आहे. त्यामुळे स्पष्ट झालं आहे की कोणतेही पैसे किंवा कशाचीही देवाणघेवाण झालेली नाही. अनिल देशमुख यांनाही पैसे देण्यात आले नाहीत, तसंच पीए कुंदन शिंदे यांनाही नाहीत. असंही गुमरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!