Share

केंद्र सरकारवर चालला शेतकऱ्यांचा आसूड, हरियाणा बॉर्डरवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये जबर संघर्ष !

Published On: 

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. आताही पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. देशभरातून विरोध होत असला तरी केंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही असं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या मते हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कायद्यांत बदल करण्याचा प्रश्नच नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.

मात्र आता कृषी कायद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला आहे. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरियाणामध्ये अंबाला-पटियाला बॉर्डरवर अडवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संघर्ष होत आहे. सीमेवरच अडवल्यामुळे संतप्त मोर्चकऱ्यांनी पोलिसांच्या दिशेने कूच करत बॅरिकेटिंग फेकून दिल्या. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने अंबाला-पटियाला सीमेवर प्रचंड तणावाचं वातावरण आहे. तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या पलवल बॉर्डरवरही 1500 पोलीस तैनात करण्यात आले आहे. पोलिसांसह महिला पोलीसही यावेळी तैनात आहेत. पलवल येथून बल्लभगड, फरिदाबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रत्येक कारची तपासणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!