Share

पुण्यात नोटिशीला न जुमानता मनसेचा ‘हायव्होल्टेज’ मोर्चा, कार्यकर्ते रस्त्यावर !

Published On: 

पुणे : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.

त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेल आदी शहरांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, या सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्त्याकर्ते आणि पोलिसांत संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाला पोलिसांकडून परवानगी दिलेली नाही पण महाराष्ट्र सैनिकांनी पोलिसांना चकवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी मोर्चा सुरू केला आहे. दरम्यान, पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पुणे पोलिसांनी मोर्चा सुरु होण्याच्या आधीच नोटीस दिलेली आहे. तरीदेखील कोणत्याही नोटीसीला न जुमानता मनसेने मोर्चा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!