Share

“चंगू मंगू च्या फालतू गप्पा ऐकण्यात आम्हाला रस नाही”

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.

संजय राऊत या प्रोमोत मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्रात कोण कोणाचा सूड घेत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? असे सवाल करताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!