मुंबई : फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही मालिकांसाठी निवड झाली नव्हती. मात्र, तो कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजेवर जाणार आहे. त्यामुळे मधल्या फळीत त्याची पोकळी निर्माण होणार असतानाच बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. अशातच क्रिकेटरसिकांना काहीशी निराश करणारी माहिती समोर येत आहे. हिटमॅन रोहित शर्मा कसोटी सामना खेळणार की नाही यावरून संभ्रम अधिक वाढला आहे.
रोहित शर्माच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने युएईमधून तो भारतात परतला आहे. युएईमधूनच तो ऑस्ट्रेलियाला जाणं अपेक्षित होतं मात्र, वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच तो घरी दाखल झाल्याचं समजत आहे. आयपीएल संपल्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघासोबतच भारतात आला. यासंदर्भात क्रीडा विश्लेषक बोरिया मजुमदार यांनी खुलासा केला आहे.
कसोटी सामना खेळण्यासाठी रोहित-इशांतला त्वरित ऑस्ट्रेलिया गाठावं लागेल
ऑस्ट्रेलिया मधील क्वारंटाईन नियम अधिक कडक आहेत. त्यांना किमान १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहावं लागेल. त्याशिवाय ते सरावासाठी वा इतर कोणत्याही कारणास्तव बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे, कसोटी सामने खेळण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, त्यांना लवकरात लवकर ऑस्ट्रेलिया गाठणं आवश्यक असून या दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलिया प्रशासनाने नियमात शिथिलता द्यावी अशी विनंती बीसीसीआयने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिल नियुक्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

