Share

कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून डाॅक्टरांना लाथा-बुक्क्यांनी चोप !

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड आणि डॉक्टरांना धक्काबुक्की केली आहे. तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही याला प्रत्युत्तर दिल्याने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी आल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सुमारे २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संगमनेर जवळच्या घुलेवाडी येथील संजीवन रुग्णालयात कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले.

कृत्रिम श्वसनयंत्रणा बंद केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाइकांनी डॉ.स्वप्नील भालके (रा.गुंजाळवाडी) व डॉ.जगदीश वाबळे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.

डॉ.भालके यांचा मोबाईल हिसकावून घेतला. काहींनी रुग्णालयात तोडफोड केली. याबाबत डॉ.भालके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात मारहाण, तोडफोड व दंगलीचा गुन्हा दाखल केला.

रुग्णाचे नातेवाईक समीर शेख यांनीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमच्या रुग्णाचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाच्या बिलाचे दीड लाख रुपये भरण्यास सांगितले.

आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी काही लोकांच्या मदतीने डॉक्टरांनी आम्हाला धक्के मारत रुग्णालयाबाहेर काढले. त्यानंतर आणखी काही जण तेथे आले. त्यांनी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या आमच्या जीपचे लाकडी दांडक्यांनी नुकसान केले, असे शेख यांनी फिर्यादित म्हटले आहे.

समीर शेख यांच्या तक्रारीवरून डॉ.जगदीश वाबळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने डॉक्टर वर्गात भीती पसरली असून संगमनेर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. अद्याप कोणाविरुद्धही कारवाई करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!