Share

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु

Published On: 

मुंबई – आगामी निवडणुका समोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील नेते मध्येच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देत असतात यामुळे वारंवार खटके देखील उडताना पाहायला मिळत असतात. या पार्श्वभूमीवर आता २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक खासदार शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती मात्र पवार यांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होतआहे.या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे अशी माहिती यापूर्वीच मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

दरम्यान, आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नवे चैतन्य निर्माण करण्याचा तसेच पक्षात आलेली मरगळ झटकण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व विजयी झालेले व पराभूत झालेल्या नेत्यांना शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करणार याबाबत चांगलीच उत्सुकता असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!