Share

‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’

Published On: 

🕒 1 min read

 सांगली – बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समितीसह सर्वांना अस्मान दाखवले.  हा पराभव सेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर शरसंधान केले. यानंतर आता भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर राऊत यांना दिले आहे.

पडळकर म्हणाले, संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडूण आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक …मराठी माणसं वाटत नाहीयेत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का ? मराठी माणसाच एवढा आकस का ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

पडळकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम ३७० चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़शाहीचा वापर केला.वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे.

किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्वीन ‘ विकासाचा मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय असा घणाघात त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!