Share

Jayant Patil | “मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला…” ; जयंत पाटलांनी मारली कोपरखळी

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जूनमध्ये कोसळले जेव्हा शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरुद्ध बंड केले होते. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. जवळपास महिनाभर राज्यात एकही मंत्री नव्हता, असे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही. मात्र उशीरा का होईना शपथविधी होत आहे. आता शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा महाराष्ट्रात संकटात असलेला आमचा शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने धाव घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप करून आणि पालकमंत्री नेमून त्यांना जिल्ह्याजिल्ह्यात पाठवतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील यांनी मारली कोपरखळी –

तसेच शिंदे यांच्यासोबत जे 40-50 आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी मारली.

h2>सभागृहात आमची भूमिका मांडू-

काही चुकीच्या प्रकरणांमध्ये नाव असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हा सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. जेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होईल, तेव्हा आम्ही सभागृहात आमची भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!