🕒 1 min read
मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. टीईटी घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं आल्यामुळे मंत्रिमंडळातून सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरी देखील त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मात्र या विस्तारात एकाही अपक्ष आमदाराचे नाही. एवढच काय तर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं देखील नाव नाहीये. त्यावरूनच बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज असल्याचं दिसून आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तारात नाव नसल्याच्या मुद्द्यावर बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिपद हा आमचा अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच यात काही शंका नाही. मात्र आम्ही सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आग्रही राहू. माझ्यामते शिंदे-फडणवीस सरकार हे मित्र पक्ष आणि अपक्षांशिवाय राहूच शकत नाही. कारण अपक्ष आमदारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळेत्यांचा विचार व्हावा हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मला शब्द दिला आहे कि, येत्या मंत्रिमंडळाचा विस्तारात तुम्हाला मंत्रिपद देऊ. हा आमचा शब्द आहे. पण राजकारणात कधीतरी दोन पाऊलं मागे यावंच लागत. तसेच आम्हीपण येऊ. कधी दोन पाऊलं पुढे जावं लागत, कधी त्याग करावा लागतो. हे सगळं राजकारणात करावंच लागत. त्याशिवाय राजकारण मजबूत होत नाही.”, अशा शब्दात त्यांनी आपल्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हे आमदार घेणार शपथ
संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील, संजय राठोड हे आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान, टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही मंत्रिपदी वर्णी
- Pradip Patwardhan Dies । एक हरहुन्नरी अभिनेता हरपला..! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
- Maharashtra Cabinet Expansion | आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिंदे गटातील 9-9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता!
- SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
- Uddhav Thackeray । महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते; उद्धव ठाकरे आक्रमक


