🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ चा शेवट झाला. जगातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यंदाच्या हंगामात गेल्या ११ दिवसांत ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कायम वरचष्मा राहिला. त्याचबरोबर समारोप समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा २३वा हंगाम कुठे खेळवला जाईल? हेदेखील निश्चित करण्यात आले आहे. बर्मिंगहॅम येथील अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज व्हिक्टोरियाच्या गव्हर्नर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कॉमनवेल्थ गेम्सचा २३वा मोसम आता ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली २०२६ मध्ये व्हिक्टोरिया येथे खेळवला जाईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ च्या समारोप समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व अचंत शरथ कमल आणि निखत जरीन यांनी केले.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २३व्या हंगामात चाहत्यांना अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा येथे प्रथमच लोकांना पाहायला मिळणार आहेत. असे सांगितले जात आहे की २०२६ मधील कॉमनवेल्थ गेम्स व्हिक्टोरियातील बल्लारट, जिलॉन्ग, बेंडिगो आणि गिप्सलँड या प्रमुख शहरांमध्ये होणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा
२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. या संपुर्ण स्पर्धेत संघाने सर्वाधिक १७८ पदके जिंकली. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने सर्वाधिक ६७ सुवर्णपदके जिंकली. याशिवाय ५७ रौप्य पदके आणि ५४ कांस्य पदकांवर कब्जा केला.
भारतीय संघाचीही उत्तम कामगिरी
२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २२ व्या हंगामात एकूण ६१ पदके जिंकली आहेत. त्यामुळे भारत सर्वाधिक पदके मिळवण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने यंदाच्या हंगामात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदके जिंकण्यात यश मिळवले. भारतीय खेळाडूंनी १६ खेळांमध्ये भाग घेऊन ही पदके मिळवली आहेत.
यजमान संघानेही दाखवली ताकद
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा २२वा मोसम यावेळी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे यजमान संघाची ताकदही पाहायला मिळाली. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये इंग्लिश संघाने एकूण १७६ पदके जिंकली. यादरम्यान संघाच्या खात्यात ५७ सुवर्ण, ६६ रौप्य आणि ५३ कांस्य पदके आली.
महत्वाच्या बातम्या :
Chitra Wagh on Sanjay Rathod | “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला…” ; चित्रा वाघ संतापल्या
Bachchu Kadu | “मंत्रीपद हा आमचा अधिकार”; मंत्रिमंडळात नाव नसल्याने बच्चू कडू नाराज
Abdul Sattar | अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान, टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही मंत्रिपदी वर्णी
Pradip Patwardhan Dies । एक हरहुन्नरी अभिनेता हरपला..! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
