Share

Chitra Wagh on Sanjay Rathod | “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला…” ; चित्रा वाघ संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जूनमध्ये कोसळले जेव्हा शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरुद्ध बंड केले होते. यामध्ये पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेले संजय राठोड सुद्धा होते. संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलने केली होती. चित्रा वाघ त्यात अग्रेसर होत्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यामुळे मोठी टीका होत आहे.

चित्रा वाघ संतापल्या-

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, “पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.”

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला होता. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघड झाले होते. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रीचेबल होते.

संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता

या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले होते. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!