Share

Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदाराचे नाव नाही. तसेच मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रपदी वर्णी लागलेली नाही. तर याच मंत्रिमंडळ विस्तारावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता तरी सरकारने राज्यातील विकासाची कामं करावीत”, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

“उशिरा का होईना पण शपथविधी झाला, महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. सध्या राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत, शेतकऱ्यांच्या-नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या आहेत. आता तरी सरकारने जनतेच्या अडचणी सोडवाव्यात”, असं मत पवारांनी व्यक्त केलं. तसेच टीईटी घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं आल्यामुळे मंत्रिमंडळातून सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरी देखील त्यांची शिंदे सरकारच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचाही समावेश शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात आहे. कदाचित यावरूनच अजित पवार यांनी सरकारला सल्ला दिला आहे. “काही आमदारांबद्दल अजूनही बोललं जात आहे. काही प्रकरणांमध्ये काही लोकांना (आमदारांना) अजूनही क्लीनचीट मिळालेली नाही. अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं आहे, त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं.”, असं ते म्हणाले.

या आमदारांनी घेतली शपथ
संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील, संजय राठोड या आमदारांनी आज मंत्रिपदाची घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!