🕒 1 min read
सांगली : उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारकडून वसुलीसाठी इंधन दर कमी केले जात नाहीत, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. यासह किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदावरही निशाणा साधत टीका केली आहे. ते सांगली जिल्ह्यातील बनपुरी येथील मेळाव्यात बोलत होते.
मोदींच्या नावावर ज्यांनी मत घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी माफिया सेनेने इमान विकल आहे. मत रामाच्या नावावर मागितली आणि निवडणूक झाल्यावर माफिया सेनेने बेमानी केली. ठाकरे – पवार सरकार कडून वसुली साठी इंधन दर कमी केले जात नाही, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमया यांनी केली. माफिया सरकार पासून आम्ही महाराष्ट्रला मुक्त करणार आहोत अस वक्तव्य ही सोमया यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
