मुंबई: कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. यालाच संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या सर्वांशी संजय राऊतांचा वैयक्तिक काय संबंध आहे? गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच आमची भूमिका हीच होती की ही जागा शिवसेनेची आहे. आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. त्यामुळे छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. मालोजीराजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातले राजकीय पक्षात जात नाही हा त्यांच्या समर्थकांचा दावा अयोग्य आहे. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : “विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने…”, अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
- “पवार साहेब या जन्मातच काय तर…”, महेश तपासे यांचा सदाभाऊंवर निशाणा
- “जागृत हिंदू समाज पवारांच्या तुटून पडण्याला कवडीचीही किंमत देत नाही”, अतुल भातखळकरांचा टोला
- “उद्या काय होईल याची काळजी…”, टेक्सासमधील ‘त्या’ घटनेनंतर बराक ओबामा यांनी व्यक्त केली चिंता
- “…तरी दोघांचे प्राण वाचले असते”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणे यांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

