Share

OBC Reservation : “विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने…”, अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशांमुळे यंदाही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याचे दिसून येते आहे. यावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणामागची कपटनीती समजून घ्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी SEBC आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. आरक्षण हा केंद्र सरकारचा विषय असल्याने या प्रक्रियेत फडणवीस सरकारने मोदी सरकारला सामील करून घेणे आवश्यक होते तसे झाले नाही. SEBC ला (मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्ते यांच्या माध्यमातुन) फडणविसांनी योजनेने उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आणले. तिथे SEBC आरक्षण वैध ठरले. खरं तर केंद्र सरकारने EWC चा पर्याय निर्माण केला असताना SEBC चा आग्रह कशासाठी? तो उघडा का पाडल्या गेला नाही? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

मात्र यातही केंद्र सरकारच्या दबावाने आपल्या सोयीचा निकाल लावून विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने ओबीसी व मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय वापर करण्यात भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा डाव यशस्वी झाला. गेली वीस वर्ष OBC जनगणनेची मागणी OBC बांधव व संघटना करत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या २ महिन्यापूर्वी देवेंद्रजीनी मुख्यमंत्री म्हणून केंद्राकडे ‘इम्पिरिकल डेटा’ मागितला तेव्हा केंद्रीय सा.न्या.मंत्री रामदास आठवले यांनी “चुका दुरुस्त करून पाठवा” असे उलट टपाली कळविले होते. या ईम्पिरिकल डेटासाठी न्यायालयाने तात्कालीन राज्य सरकारला ८ आठवड्याची मुदत दिली होती. मात्र फडणवीस सरकारने या मुदतीत केंद्राकडे चुका दुरुस्त करून न पाठवल्याने OBC आरक्षणाचा खुन झाला. त्यास सर्वस्वी देवेंद्र फडणवीस व भाजपा जबाबदार आहे आणि तेच आज OBC आरक्षणासाठी मोर्चे काढताहेत. असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!