Share

… म्हणून थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वीजबिलांची वसूली करण्यावर महावितरण आहे ठाम

Published On: 

🕒 1 min read

बारामती – गेल्या दहा महिन्यांत बारामती परिमंडलातील 4 लाख 81 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आली असून, वीज खरेदी व वितरण करणे मुश्किल बनले आहे. परिणामी अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वसूली करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने महावितरणने या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचा कठोर निर्णय घेतलेला आहे.

लॉकडाऊनच्या काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटत होते. लॉकडाऊनमध्ये घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकॉर्डब्रेक होती. त्यात रिडींग व वीजबिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाईल मेसेजवर बिले देण्यात आले. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडींग सुरु होताच रिडींगनुसार बिले देण्यात आली. मात्र यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी वाढत गेली. त्यासाठी थकबाकीचे हप्ते करण्यात आले.

एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. बिलातील शंका दूर करण्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक देऊन प्रत्येकाला त्याचा वापराचा हिशोब दिला. वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात 3201 वेबिनार, 5678 मेळावे घेण्यात आले होते. तसेच 15524 मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी 1742 मदत कक्ष अद्यापही सुरु असून, त्यातून आलेल्या ९८०४९९ पैकी ९३३३२४ तक्रारींचे निवारण सुध्दा केलेले आहे.

बारामती परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळजवळ 10 लाख ग्राहकांकडे 518 कोटी रुपये थकीत असून त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीजबिल न भरणारे 4 लाख 81 हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे 340 कोटी येणेबाकी आहे. विंनत्या, आवाहन करुनही रक्कम वसूली झाली नसल्याने आता वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!