चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अर्जुन तेंडुलकर या लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल.
अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल.
तत्पुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट ‘अ’च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात त्याने आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली. त्याच्या कामगिरीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखानावर १९४ धावांनी मात केली.
महत्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात ५ हजार ८९१ जणांना दिली कोरोना प्रतिबंधक लस
- पवार माढ्याला गेले आणि घोषणा करून मागे फिरले; पवारांच्या टीकेला चंद्रकांतदादांचे प्रत्युत्तर
- ममता बॅनर्जी यांची ‘मां की रसोई’ ; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण
- मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग उद्यापासून होणार खुली
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
