Share

‘निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’; कॉंग्रेसची मागणी

Published On: 

मुंबई: निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेण्याची मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. यावेळी नाना पाटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) देखील उपस्थित होते. या भेटीनंतर नाना पाटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नाना पाटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली या बद्दल शुभेच्छा देखील दिल्या.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, सरकारने केलेल्या कामांमध्ये ज्या काही त्रुटी आहेत यावर देखील मुख्यमंत्र्यांशी बोललो. ज्या काही अडचणी आहेत त्यासंदर्भात त्यांच्या समोर आम्ही भूमिका मांडल्या. तसेच अजून सक्षमपणे हे सरकार पुढे कसं न्यायचं यावर देखील आम्ही चर्चा केली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं.

ऊर्जा विभागबद्दल बोलताना पटोले म्हणाले, मागच्या सरकारने ज्या काही चुका आणि त्याचे परिणाम हे राज्याच्या सगळ्या शेतकाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. मागच्या सरकारने केलेल्या त्या चुकांचे परिणाम ग्राहकांना, विद्युत ग्राहकांना भोगावे लागतात, असं म्हणत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच राज्याच्या कामांमध्ये समान निधी वाटप कशा पद्धतीने करता येईल यावर देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे पटोले यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!