🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोनाच्या महामारीमध्ये वैद्यकीय उपचारांबरोबरच मानसिक आधार महत्त्वाचा आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटत असली, तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच माझ्याकडून राहुरी महाविद्यालयातील कोविड सेंटरला मनापासून शुभेच्छा आहेत, परंतु त्याच्या उदघाटनप्रसंगी माझ्यावर राजकीय टीका उचित नव्हती. ज्यांना बोलण्यासाठी व्यासपीठ राहिले नाही ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करतात, अशी टीका ना.प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे नाव न घेता केली आहे.
प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे बालाजी मंदिर ट्रस्टच्या मंगल कार्यालयात उभारलेल्या राहुरी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ना.तनपुरे बोलत होते. यावेळी तनपुरे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये पहिले चार महिने जशी नागरिकांनी काळजी घेतली, त्याचप्रमाणे शासकीय नियमांचे पालन करून गर्दी न करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अनावश्यक बाहेर न पडणे अशी काळजी घेऊन रुग्णांसाठी सुरू केलेले कोविड सेंटर कायम रिकामे रहावे असा आशावाद नामदार तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच पालिकेस घरकुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून वर्षभरात लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल. मागील १० वर्षांत ग्रामीण भागात रस्त्याची कामे झाली नाहीत, असा टोलाही ना.तनपुरे यांनी माजी आमदार कर्डीले यांना लगावला आहे. यावेळी डॉ.शरद धावडे, डॉ.सुनील पोखर्णा, सुरेश वाबळे, निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, नगराध्यक्ष अनिता पोपळघट, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, नंदकुमार गागरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- शिवसेनेनं आघाडी धर्म मोडला; काँग्रेसचे नेते फोडले
- परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला, उर्वरित 85 टक्के जनतेचं काय ? – प्रकाश आंबेडकर
- दिग्गज अभिनेत्रीने कॉंग्रेसला ठोकला राम-राम ; भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
- मेट्रोच्या सुखाच्या प्रवासापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा,मनमौजी राजपुत्र करत आहेत
- बिहारमधील निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
