Share

बिहारमधील निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती, प्रार्थना स्थळे खुली करण्याचा विषय, मुंबई लोकल प्रवासाची सर्व सामान्यांस मुभा, मेट्रो कारशेड प्रकल्प आदी विषयांवर भाष्य केले.

कार्यालयात जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार का, याकडे डोळे लावून बसणाऱ्या चाकरमान्यांची रविवारी साफ निराशा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मंदिर खुली करण्याबाबत हळुवार पणाने जात आहे. काही जणं म्हणतात हे उघडलं ते का नाही? जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्याहून जास्त जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे येत्या सर्वधर्मांच्या सणात आपल्याला खूप काळजीपूर्वक राहावं लागणार आहे, असं सांगत मंदिरं खुली न करण्याचे ठाकरेंनी जाहीर केले.

यासर्व बाबींवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्र सरकार व राज्य सरकार यांची भूमिका विसंगत असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल . सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं भाकीत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानं पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!