🕒 1 min read
नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.खुशबू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळवला आहे. पक्षातील मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अभिनय कारकीर्दीला अलविदा करत खुशबू यांनी मे २०१० मध्ये डीएमकेत प्रवेश करून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ साली एम. के. स्टॅलिन यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी डीएमकेला रामराम ठोकला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे. असं त्या म्हणाल्या होत्या. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं खुशबू यांना तिकीट नाकारलं होतं.
तामिळनाडूमध्ये खुशबू सुंदर यांचे चांगले राजकीय वजन आहे. त्याचा भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून पुढे आणू शकते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुंदर ह्या कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- ‘मुंबईत बत्ती गुल झाली यासाठी सरकार अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही हीच अपेक्षा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
