नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावर्षी मागणी मराठा समाजातील नेते करत आहेत. तर, मेगा पोलीस भरती व राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलाव्यात अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आणि अखेर ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. “MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.
“मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला. “मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- दिग्गज अभिनेत्रीने कॉंग्रेसला ठोकला राम-राम ; भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- ‘आता गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण महाराजांचा पुतळा हटवू देणार नाही’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

