मुंबई :.हिंदुत्ववाद या मुद्द्यावरुन राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये टीका करण्याची स्पर्धा सुरु असतानाच आज शिवसेनेने याच मुद्द्यावरुन भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.
काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी शिवसेनेनं हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण देत म्हटलं आहे. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय.
भाजपमध्ये सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही. देशातील एकंदरीत स्थिती अशी आहे की, आज हिंदू खतऱ्यात आला आहे. हा मजकूर लिहीत असताना काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ा आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू केले आहे. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांत काश्मीर खोऱ्यातील २२० हिंदू-शीख कुटुंबांनी जम्मूतील निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे काही (नव) हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही, असं राऊतांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी


