Share

‘ज्यांना भुजबळ करू अशी धमकी विरोधक देत आहेत, ते देखील निर्दोष सुटतील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त करत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

यानंतर छगन भुजबळ यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली… माझा न्यायदेवतेवर विश्वास होता.अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला. माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे,’ असं भुजबळ यांनी म्हटलं.

यासोबतच, ‘विरोधक खोटे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना भुजबळ करू अशी धमकी विरोधक देत आहेत, ते देखील माझ्याप्रमाणे निर्दोष सुटतील,’ असा विश्वास देखील भुजबळांनी व्यक्त केलाय. तर, ‘तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं,’ असं म्हणत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली असली तरी आता मात्र कोणाच्याही बद्दल राग नाही, द्वेष नाही असं देखील आवर्जून नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!