मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. हे सरकार पाच वर्षे टिकेल असं वरिष्ठ नेते वारंवार सांगत असले तरी या तीन पक्षांमधील नेत्यांच्या एकमेकांविरोधातील नाराजी ही अनेकदा समोर आली आहे. हे तीनचाकी सरकार अंतर्गत विरोधाने कोसळेल असा दावा भाजप करत असून नाराजी वेळीच शमवण्यासाठी वरिष्ठ नेते मध्यस्थी करून राज्य पातळीवर आघाडीत बिघाडी होणार नाही याची खबरदारी बाळगत आहेत.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार याआधी काँग्रेसनं केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक काल झाली. यावेळी नाराजी स्पष्ट झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाच्या निवडणुक लढवलेल्या सर्व विजयी व पराभूत सदस्यांची आढावा बैठक काल बोलवली होती. या बैठकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेल्या सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी लागणारा शासन निधी मिळताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने पक्षाच्या वतीने सर्वांची समजूत काढण्यात आली,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.
आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी पक्षाच्या निवडणूक लढवलेल्या सर्व विजयी व पराभूत सदस्यांची आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेल्या सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी लागणारा शासन निधी मिळताना येणाऱ्या अडचणी मांडल्या – ना. @AjitPawarSpeaks @PawarSpeaks pic.twitter.com/EVJzmz1eaQ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 9, 2021
राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेना वा काही ठिकाणी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असे चित्र होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर राजकीय समीकरणं बदलली असली तरी स्थानिक पातळीवर जो समन्वय साधायला हवा तो अजून दिसून येत नसल्याचे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे – पटोले
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

