मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खडसेंनी मंत्रिपदाचा वापर करुन पुण्यातील जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचं ईडीच्या कोर्टाने म्हंटलं आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करत जमीन खरेदीत गैरव्यवहार केला असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
या पार्श्वभूमीवर ईडीने जमीन खरेदीच्या गैरव्यवहाराची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने खडसेंनी गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं म्हंटलं आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..तर मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनाला बसायला तयार’, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
