Share

अरे हा भारताचा संघ की मुंबई इंडियन्सचा?; टी 20 विश्वचषक संघावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी 8 सप्टेंबर रोजी आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टी 20 साठी निवडलेल्या संघात काही खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसीच्या या मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात अशा सात खेळाडूंना स्थान दिले आहे, जे पहिल्यांदा टी -20 विश्वचषकात खेळतील.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यामुळे संघ संतुलित दिसत आहे. मात्र, 8 खेळाडू असेही आहेत ज्यांना टी 20 विश्वचषक खेळण्याचा अनुभव आहे आणि 7 खेळाडू असे आहेत जे प्रथमच निळ्या जर्सीमध्ये दिसतील.

टी -20 विश्वचषकासाठी निवड समितीने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा जास्त समावेश केला आहे. निवड झालेल्यांपैकी मुंबई इंडियन्समधील, कर्णधार रोहित शर्मा, फंलदाज सुर्यकुमार यादव, फंलदाज, यष्टीरक्षक इशान किशन, अष्टपैलू हार्दिक पांड्या, गोलंदाज राहुल चहर आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा चालू आहे

टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद. शमी, आर अश्विन, अक्षर पटेल, इशान किशन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती.

राखीव खेळाडू

श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!