Share

‘यांना माहिती आहे सत्ता यांचीचं येणार , त्यामुळे भाजप नेत्यांना माज आलाय !’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सेल्फिवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. कोल्हापुर सांगलीत जल आपत्ती आली असताना सत्ताधारी नेते घटना स्थळी भेट देताना सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी पोझ देत आहेत. त्यामुळे अशा असंवेदनशील सरकारचे आणि नेत्यांनी राजीनामे देयला हवेत अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाजनांच्या सेल्फी पराक्रमावर टीका केली आहे.

आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असं सगळं करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की ते निवडून येणारच आहेत. एक प्रकारचा माज आलाय ह्यांना, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारचा माज प्रकाशझोतात आणला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यावर प्रचंड मोठी आपत्ती आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. एनडीआरएफ, नौदल, वायूदल आणि आर्मी या तिन्ही लष्करी यंत्रणा देखील बचाव कार्यास उतरल्या आहेत. तरी देखील परिस्थिती हाताबाहेर आहे. प्रशासन हतबल झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!