🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.
यावरूनचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुजोर सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पूरग्रस्त ठिकाणी सगळी संतापजनक परिस्थिती आहे. सत्ताधारी नेत्यांना फिरायला हेलिकॉप्टर मिळतं पण लोकांना बाहेर काढायला मिळत नाही. अनेक गावांमध्ये शेकडोने लोकसंख्या आहे. मात्र तिथे शासनाने 2 ते 3 बोटी दिल्या आहेत. शेकडो लोक २ ते ३ बोटीतून कसे काय सुरक्षित स्थळी हलवली जाणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
तसेच भाजप सरकार मदतीच्या माध्यमातून देखील स्वतःचा प्रचार करत आहे. अशा परिस्थितीत देखील राजकीय स्वार्थ साधत आहे. इकडे पूरस्थिती आहे आणि यांना मात्र राजकारण महत्त्वाचं वाटतं, आपण काय तरी करतोय हा देखावा यांना करायचा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
दरम्यान महापूर पाहणीवेळी मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ, पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही ? मुख्यमंत्री साहेब या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा. अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केली आहे.
30 वर्ष पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा उद्या शिवसेनेत प्रवेश ?
राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर का फुटत नाही ? – अमोल कोल्हे
‘महाजन दात काढून काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

