🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कुपोषण कमी करण्यासाठी डॉ. ए.पी.जी अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु आहे. कोरोना काळात कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पालकांमध्ये आवश्यक ती सतर्कता पाहण्यास मिळत नाही.
त्यांना सहकार्य केले व आपल्या बालकास दिलेला आहार नियमितपणे दिल्यास कुपोषण निश्चित थांबेल. यासाठीच अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात बालविकास प्रकल्प अधिकारी भारती साताळकर ह्या तरुण अधिकारी सर्व परिस्थितीवर मात करून लढत आहे.
अकोले तालुक्यातील राजूर भाग हा आदिवासी आहे. डॉ. ए.पी.जी अब्दुल कलाम अमृत आहार योजना कुपोषण कमी करण्यासाठी सुरु आहे. शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्त्याप्रमाणे खरेदी करून लाभार्थ्यांना आहार पोचवायचा आहे.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार पोहचविण्यासाठी साताळकर अधिक आग्रही आहेत. सरासरी बघितले तर, दर महिन्याला चार ते साडेचार हजार गरोदर महिला, स्तनदा माता सात महिने ते सहा वर्षापर्यंतचे बालके असून, त्यांना अंडी, कडधान्य, केळी, दूध दिले जाते.
पर्यायी व्यवस्था म्हणून खजूर व राजगिरेचे लाडू देण्यात येतात. सध्या अंडी व केळी वाटप सुरु आहे. भाजीपाला, लिंबू, हळद, मिरची मसाले हे आहारात दिले जातात. अंगणवाडी सेविका हा आहार सध्या स्वतःच्या खर्चातून देतात व शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर त्यांच्या बँक खात्यावर तो निधी वर्ग होतो. त्यानंतर संबंधित दुकानदारांचे बिल जमा केले जाते.
कुपोषित व अतिकुपोषित विचार केला, तर तीव्र कुपोषित ६३ बालके आहेत. त्याच्यासाठी शासनाकडून सकस आहार म्हणून सकस पिठाचा पुरवठा होतो. त्यातून कुपोषणाचे प्रमाण कमी होते.
कोरोनामध्ये सेविका पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून मुलांना व कुटुंबाना स्वच्छतेचे पालन कसे करायचे हे सांगितले जाते. पालकांचा यात सहभाग व प्रबोधन महत्वाचे आहे यातून निश्चितच कुपोषणाचे प्रमाणही वेगाने कमी होईल, अशी आशा साताळकर यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- यंदाच्या दिवाळीत रितेश-जेनेलिया घेऊन येत आहेत जनसामान्यांसाठी ‘आशेची रोषणाई’…
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !
- बाहुबली फेम ‘देवसेना’चा आज ३९वा वाढदिवस…
- कमल हसन उतरणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक रिंगणात…
- …म्हणून व्लादिमीर पुतीन सोडणार अध्यक्षपद ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
