मॉस्कोः गेल्या वर्षभरा पासून जगाचे लक्ष लागले आहे ते केवळ कोरोना या महामारी कडे त्या नंतर लगोलग होत असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुका पार पडल्या प्रचंड गोंधळानंतर अद्याप या निवडणुकांचा निकाल मात्र गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आता अमेरिका या महासत्ता राष्ट्राचे शत्रू राष्ट्र मानल्या जाणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील वर्षी जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुतीन पार्किंसन्स आजारानं ग्रासलेले आहेत. त्यामुळेच ते राष्ट्राध्यक्षपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशियामध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. मात्र व्लादिमीर पुतीन यांनी 2026 पर्यंत पदावर कायम राखण्याची घटनादुरुस्ती करून घेतली होती. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या 67 वर्षीय पुतीन यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे; परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी एक विधेयक सादर केले होते. या विधेयकानुसार पुतीन जिवंत असेपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईपासून सूट दिली जाईल. तसेच सरकारकडून त्यांना सर्व सवलती दिल्या जातील. रशियाची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या आरटीनुसार हे विधेयक म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाचे संकेत आहेत. पुतीन यांना पार्किंसन्स आजार असल्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आलेली नाही. दरम्यान, सोलोवी यांनी सांगितले की, लवकरच एक नवे राष्ट्राध्यक्ष नियुक्त केले जातील. त्यांना पुतीन यांच्या संरक्षणाखाली प्रशिक्षित केले जाईल. या घटनादुरुस्तींना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेली असल्यानं पुतीन यांच्या स्वाक्षरीनंतर त्याबाबतचे कायदाही तयार झाला आहे. वादग्रस्त घटनादुरुस्तींवर मतदान घेऊन त्याला लोकशाही पद्धतीची मान्यता देण्याचा हा प्रयत्न असल्याचीही टीका त्यावेळी करण्यात आली होती.
पुतीन यांनी राजीनामा द्यावा, अशी इच्छा त्यांची गर्लफ्रेंड जिम्नास्केट अलाना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुलींनी केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये पुतीन गंभीर आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात मॉस्कोचे राजकीय शास्त्रज्ञ वलेरी सोलोवी यांच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे. सोलोवी म्हणाल्या, “पुतीन यांचं एक कुटुंब आहे, त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. ते जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची सार्वजनिकरीत्या घोषणा करू शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आदित्यजी ! …तर पुढील सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देत राहतील – सत्यजित तांबे
- ‘आमचा यज्ञ होऊ दिला नाही आता तुम्हाला शाप लागेल’ – तुषार भोसले
- व्हॉट्सअॅपवरुन देखील पैसे ट्रान्सफर करता येणार ! व्हॉट्सअॅपने आणले पेमेंट फीचर
- अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या राम कदमांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
- चिल, डोनाल्ड चिल ! म्हणत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना मतमोजणी थांबवण्यावरून सुनावले…


