नवी दिल्लीः तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाईकची चर्चा सुरू होती. तसेच रॉयल एनफील्ड बाईक चाहत्यांना या बाईकची फार उत्सूकता लागली होती. अखेर रॉयल एनफिल्ड ची बहुचर्चित रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 या मोटरसायकलला अखेर भारतात लाँच करण्यात आले आहे.
आज व्हर्च्यूअल लाँच इव्हेंटमध्ये ही बाइक नोंद करण्यात आली असून याच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 ला भारतात १ लाख ७५ हजार ८२५ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. फायरबॉल, स्टेलार आणि सुपर नोव्हा यासारख्या 3 व्हेरियंट आणि पिवळा, काळा आणि लाल या रंगांमध्ये ही बाइक ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. लाँच करण्यात आलेल्या या बाईकची होंडा हनेस CB350 आणि जावा टि्विन्स या बाईकशी टक्कर होईल. मीटियर ३५० ची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 ची सुरुवातीची व्हेरियंट फायरबॉल ची किंमत १ लाख ७५ लाख ८२५ रुपये आहे. तर स्टेलर व्हेरियंटची किंमत १ लाख ८१ हजार ३४२ रुपये आहे. टॉप मॉडल व्हेरियंट सुपरनोवाची किंमत १ लाख ९० हजार ५३६ रुपये आहे. यात १५ हून जास्त फ्यूल टँक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे.
नवीन इंजिन आणि स्मार्ट कनेक्टिविटी रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 मध्ये BS6 कंप्लायंट 349 cc चे एयर कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे 20.5hp ची पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. ही जबरदस्त बाीक ५ स्पीड गियरबॉक्स सोबत लाँच करण्यात आली आहे. मीटियर ३५० मध्ये पहिल्यांदा रॉयल एनफील्ड ने स्मार्ट कनेक्टिविटी दिली आहे. आता रॉयल एनफील्ड अॅपच्या मदतीने फोनला कनेक्ट आणि कंट्रोल करू शकाल. तसेच फोनने नेविगेशन कनेक्ट करून इंस्ट्रूमेंट क्लस्टर मध्ये पाहिले जावू शकते.
रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 चे जबरदस्त फीचर्स रॉयल एनफील्ड मीटियर ३५० चे डिजिटल एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर मध्ये तुम्हाला गियर पोजिशन सोबत ओडो मिटर, फ्युएल गॅज, ट्रिप मीटर आणि सर्विस रिमाइंर यासारखे फीचर्स पाहता येतील. Royal Enfield Meteor 350 चे बाकी फीचर्स मध्ये डुअल चॅनल ABS, ट्विन शॉक अब्जॉर्बर, LED DRL चे सर्कुलर हेलोजन हेडलेंप, LED टेल लँप आणि 41एमएम टेलिस्कोपिक फोर्क्स दिले आहेत. तसेच याची सीट सुद्धा खूप आरामदायक आहे. त्यामुळे आता बाइक प्रेमिंकडून या बाइक ला किती पसंती दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे.
महत्वाच्या बातम्या
- चिल, डोनाल्ड चिल ! म्हणत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना मतमोजणी थांबवण्यावरून सुनावले…
- देशभरातील महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यासाठी युजीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
- टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- राज्यपाल चांगली व्यक्ती ते प्रस्तावाला विरोध करणार नाहीत – भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

