Share

कमल हसन उतरणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक रिंगणात…

Published On: 

चेन्नई – सिनेसृष्टी आणि राजकारण हे एक जणू काही समीकरण आहे. त्यामुळे बॉलीवूडची अनेक मंडळी सक्रिय राजकारणात तसेच अनेक राजकीय पक्षांच्या भूमिकांचं वेळोवेळी समर्थन करताना दिसून येतात. सध्या कोरूना नंतर च्या काळात देशासमोर अनेक समस्यां अनेक आव्हाने उभी आहेत यामध्येच बिहार विधानसभा निवडणुका पार पडत आहेत तर पुढील वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रवेश लांबला आहे. तर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे. यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकार्यही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाच्या वतीने कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुढच्या वर्षी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. कमल हासन म्हणाले की, रजनीकांत यांच्याशी ते राजकारणाविषयी चर्चा करीत आहेत. त्यांनी राजकीय भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाचे राजकारण आरोप करण्यासाठी किंवा सूडबुद्धीचे असणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही कमल हासन यांनी सांगितले.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत अभिनेता कमल हासन यांनी दिले आहेत. यासाठी रजनीकांत यांचेही सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता रजनीकांत हे आपला नवीन पक्ष स्थापन करणार की, तेदेखील मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षात प्रवेश करणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!