🕒 1 min read
मुंबई:- अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण मदतीचा हात करत आहेत. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचं कसलं हिंदुत्व आहे, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली आहे.
यह राम भक्तो का अपमान है क्या शिवसेना का यही हिन्दुत्व है? सभी राम भक्तों की शिवसेना माफी मांगे
— Ram Kadam (@ramkadam) January 24, 2021
राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचं हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
