🕒 1 min read
मुंबई : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपला अनुभवी गोलंदाज उमेश यादव याला संघातून मुक्त केले होते. त्यानंतर आता यादव चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
झाले असे की, यादवने आयपीएल २०२० मध्ये बेंगलोर संघाकडून खेळताना खास कामगिरी केली नाही. पूर्ण हंगामात २ सामने खेळताना त्याने एकही विकेट विकेट घेतली नाही. तत्पुर्वी आयपीएल २०१९ मध्येही बेंगलोरकडून ११ सामने खेळताना त्याने अवघ्या ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनाला पाहता यंदा बेंगलोरने यादवला संघातून डच्चू दिला.

त्यानंतर यादवने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन बेंगलोर संघाला अनफॉलो केले अन् अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई संघाला फॉलो केले. एवढेच नव्हे तर, यादवने चेन्नईला वैयक्तिकपणे फॉलो केल्यानंतर चेन्नईनेही यादवला फॉलो करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधान आले आहे. चेन्नई संघ या ३३ वर्षीय वेगवान गोलंदाजाला खरेदी करणार आहे, असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी
- ‘अकोल्याच्या मोर्णा नदीप्रमाणेच औरंगाबादच्या खाम नदीला मिळणार जीवनदान
- ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांना संपवले’ साक्षी महाराजांचे कॉंग्रेसवर गंभीर आरोप !
- शास्त्रींना ट्रोल करणारे चाहते का मागतायेत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण
- भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्त्या जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
