टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावलेला असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधान आल्यानंतर नांदगावमध्ये स्वागत फलकावरून भुजबळ पिता-पुत्रांचे छायाचित्र कार्यकर्त्यांनी टाकणे टाळले आहे. त्यामुळे नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्याची भुजबळ पिता पुत्रा विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या काल नांदगांव दौऱ्यावर होत्या .त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र नांदगाव तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांचे छायाचित्र टाकणे टाळले आहे. त्यामुळे भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा उधान आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू आहे. अशातच छगन भुजबळांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी भुजबळांना त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी विचारले असता मैं यही हू असे तीनदा ठणकावून सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याच सांगितले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

