🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाला आतापर्यंत मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) अधिवेशनाला हजेरी लावणार का? असा प्रश्न विरोधकांनी केला असून सर्वांचीच उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
भातखळकर ट्विट करत म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हा औत्सुक्याचा विषय ठरणार असेल तर ते सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्दैवाची साक्ष देते. अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हा औत्सुक्याचा विषय ठरणार असेल तर ते सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्दैवाची साक्ष देते. pic.twitter.com/k1Z5J52j4x
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 28, 2021
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज गाजण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्धार आज महाविकास आघाडी सरकारने केला आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्राचे सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे.
तर दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणेंना शिवसैनिक संतोष परब यांच्यावर केलेल्या चाकूहल्ल्या प्रकरणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे विधिमंडळातील वातावरण प्रचंड तापले आहे.
तिकडे कोकणात वातावरण तापलं आहे. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच निलंबित १२ आमदारांनी आम्हालाही विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली आहे. आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणं संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
