🕒 1 min read
Amol Mitkari । मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा आणखीन एक बडा नेता जेल मध्ये जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागल्या आहेत.
यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. सध्या राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची चर्चा आहे.
तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये सिंचन घोट्यासंदर्भात भाष्य केले आहे. या ट्विटमधून मोहित कंबोज यांचा रोख हा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नावं आहेत. पाचवी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तसेच ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’ असं देखील त्यांनी म्हटले आहे. यामध्ये आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो ते शंभर टक्के तुरुंगात जातात असेच कंबोज यांना सुचवायचे आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
1:- Anil Deshmukh
2:- Nawab Malik
3:- Sanjay Panday
4:- Sanjay Raut
5:- ____________अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) August 17, 2022
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच स्पष्टीकरण
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय. कोणताही नेता, नागरिक ट्विट करतो, तेव्हा त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतात. त्या घोटाळ्याबद्दलची कागदपत्र असतील. तपासयंत्रणांना ते पुरावे देतील. असं कोणत्याही व्यक्तीला थेट जेलमध्ये पाठवण्याची पद्धत नाही. तपास यंत्रणांकडे पुरावे दिले जातील, यंत्रणा तपास करतील आणि त्यानंतर त्या पाहिजे त्या कारवाया करतील.
महत्वाच्या बातम्या :
- Amol mitkari | हिंदूंचा अपमान करणाऱ्या पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा- अमोल मिटकरी
- Chandrasekhar Bawankule | पुराव्यांशिवाय कुणी बोलणार नाही; मोहित कंबोजांच्या ट्विटला बावनकुळेंचा दुजोरा
- Sangeeta Tiwari | “शरद पोंक्षे हा आतंकवादी आणि नथुरामाची औलाद”; संगीता तिवारींनी दिला इशारा
- Assembly Session 2022 | पावसाळी अधिवेशन 2022 : आ. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
- Deepali Sayed | “काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने द्या” ; दीपाली सय्यद यांची केंद्र सरकारला मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
