मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच डोंबिवलीतील ब्राह्मण सभागृह येथे झालेल्या व्याख्यानात आणखी काही वादग्रस्त विधानं केली होती. तर त्यावर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिल्या प्रदेशाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पोंक्षेंना खडे बोल सुनावले आहेत. “शरद पोंक्षे हा आतंकवादी आणि नथुरामाची औलाद आहे.”, अशी टीका त्यांनी केली आहे.
“शरद पोंक्षे नावाचा कुणीतरी अभिनेता आहे. तो स्वतःला खूप मोठा नेता समजू लागला आहे. पण तो नेता असून एक आतंकवादी आहे. तो नथुरामाची औलाद आहे.”, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. तर पुढे संगीता तिवारी म्हणाल्या कि, “शरद पोंक्षे हा त्याच्या भाषणात सांगतोय कि अहिंसेचे डोस दिल्याने हिंदुंमध्ये नपुंसकता आली आहे. पण एक दिवस मी याचा खरच करेक्ट कार्यक्रम लावीन.”, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. संगीता तिवारींसह काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी पोंक्षेंच्या या विधानावर टीका केली आहे. तर याचमुळे पोंक्षेंविरोधात पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी डेक्कन येथील पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच तक्रार दाखल करून आम्ही त्यांना एकप्रकारे समज देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पुन्हा अशी वक्तव्यं केली तर आम्ही कसे मर्द आहोत, हे त्यांना दाखवून देऊ आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू, असाही इशारा काँग्रेस कमिटीचे नेते विशाल गुंड यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते शरद पोंक्षे?
शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांच्या भाषणात सावरकरांविषयी आपले विचार मांडत असतात. तसेच यावेळी बोलतानाही ते म्हणाले कि, “अहिंस परमो धर्मः अशी आपली शिकवण आहे. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे पण धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणे हा त्यापेक्षा मोठा धर्म आहे. आम्हाला अहिंसेचे एवढे डोस पाजले गेलेत की त्यामुळे आज हिंदु समाज नपुंसक झालाय हे आपल्याला कळलंच नाही. आम्हाला आता रागही नाही आणि चीड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवलेलाच नाही. भारताला स्वातंत्र्य हे रक्त न सांडता मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं. पण असं मानणं हा ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा घोर अपमान आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari । मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा; अमोल मिटकरी आक्रमक
- Mohit Kamboj । मलिक आणि देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार?; कंबोज यांचं सूचक ट्विट
- Shivsena । खातेवाटपानंतर चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांची अवस्था केविलवाणी झालीय; शिवसेनेची खोचक टीका
- Shivsena । शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री. फडणवीस महोदय आहेत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील


