Chandrasekhar Bawankule | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा आणखीन एक बडा नेता जेल मध्ये जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागल्या आहेत. यानंतर यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
मोहित कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय. कोणताही नेता, नागरिक ट्विट करतो, तेव्हा त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतात. त्या घोटाळ्याबद्दलची कागदपत्र असतील. तपासयंत्रणांना ते पुरावे देतील. असं कोणत्याही व्यक्तीला थेट जेलमध्ये पाठवण्याची पद्धत नाही. तपास यंत्रणांकडे पुरावे दिले जातील, यंत्रणा तपास करतील आणि त्यानंतर त्या पाहिजे त्या कारवाया करतील, असं ते म्हणाले आहेत.
ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले मोहित कंबोज ?
ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले कि, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. तसेच “मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) August 16, 2022
अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
अमोल मिटकरी म्हणाले कि, मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का, असा संतप्त सवाल करत त्याच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Sangeeta Tiwari | “शरद पोंक्षे हा आतंकवादी आणि नथुरामाची औलाद”; संगीता तिवारींनी दिला इशारा
- Assembly Session 2022 | पावसाळी अधिवेशन 2022 : आ. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
- Deepali Sayed | “काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने द्या” ; दीपाली सय्यद यांची केंद्र सरकारला मागणी
- Amol Mitkari । मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा; अमोल मिटकरी आक्रमक
- Mohit Kamboj । मलिक आणि देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार?; कंबोज यांचं सूचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

