Share

Deepali Sayed | “काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने द्या” ; दीपाली सय्यद यांची केंद्र सरकारला मागणी

Published On: 

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित बांधवांना आधी त्यांची नावे विचारली. त्यानंतर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सफरचंदाच्या बागेत काश्मिरी पंडित बांधवांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने देण्याची मागणी केली आहे.

दीपाली सय्यद यांचे ट्वीट-

दीपाली सय्यद म्हणाल्या, “काश्मिरी पंडीतांवर वर्षानुवर्षे होणाऱ्या हल्ल्यांना लक्षात घेता केंद्र सरकारने त्यांना स्वरक्षणा करीता शस्त्र परवाने देऊन, सेल्फ डिफेन्सच्या ट्रेनिंगची सोय तातडीने करावी.”

काश्मिरी पंडित खोऱ्यात असुरक्षित –

दरम्यान या प्रकरणावर खळबळ माजली आहे. विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. शोपियान हल्ल्याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मनोज सिन्हा हे जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सुरक्षेचे कारण देत कलम ३७० हटवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण काश्मिरी पंडित खोऱ्यात असुरक्षित आहेत.

अनुपम खेर यांनी व्यक्त केला संताप –

अनुपम खेर यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनाशी अगदी जवळचा आहे. चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा काश्मिरी पंडित म्हणून दाखवण्यात आली होती. काश्मिरी पंडिताच्या हत्येचे वृत्त समोर आल्यानंतर अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे.

अनुपम खेर म्हणाले, काश्मिरी पंडितांवर अजूनही अत्याचार होत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ते भारताचे समर्थन करणाऱ्यांना मारत आहेत. तसेच गेल्या 30 वर्षांपासून असे होत असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!