मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच डोंबिवलीतील ब्राह्मण सभागृह येथे झालेल्या व्याख्यानात आणखी काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून पोंक्षेंवर सर्वच स्थरातून टीका केली जात आहे. अशीच टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आज केली आहे. तसेच शरद पोंक्षेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले कि, “जो व्यक्ती राज्यभर नथुराम गोडसेच्या नाटकाचे प्रयोग करत फिरत असेल. तो व्यक्ती मुळातच हिंसक असणार यात काही वाद नाही. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्माने सर्व जातींतील लोकांना सामंत देण्याचं काम केलं आहे. शरद पोंक्षेंसारखे लोक अशी वादग्रस्त वक्तव्य फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच करतात. आणि जर तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तर माझी सर्व हिंदूत्ववादी संघटनांना आणि प्रामुख्याने कट्टर हिंदुत्वाचा आव घेऊन सत्तेत बसलेले मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती आहे कि, हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पोंक्षेंविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा.”
पोंक्षेंविरुद्ध तक्रार दाखल
शरद पोंक्षेंविरोधात पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी डेक्कन येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रार दाखल करून आम्ही त्यांना एकप्रकारे समज देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पुन्हा अशी वक्तव्यं पुन्हा केली तर आम्ही कसे मर्द आहोत, हे त्यांना दाखवून देऊ आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू, असाही इशारा काँग्रेस कमिटीचे नेते विशाल गुंड यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते शरद पोंक्षे?
शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांच्या भाषणात सावरकरांविषयी आपले विचार मांडत असतात. तसेच यावेळी बोलतानाही ते म्हणाले कि, “अहिंस परमो धर्मः अशी आपली शिकवण आहे. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे पण धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणे हा त्यापेक्षा मोठा धर्म आहे. आम्हाला अहिंसेचे एवढे डोस पाजले गेलेत की त्यामुळे आज हिंदु समाज नपुंसक झालाय हे आपल्याला कळलंच नाही. आम्हाला आता रागही नाही आणि चीड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवलेलाच नाही. भारताला स्वातंत्र्य हे रक्त न सांडता मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं. पण असं मानणं हा ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा घोर अपमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari । मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा; अमोल मिटकरी आक्रमक
- Mohit Kamboj । मलिक आणि देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार?; कंबोज यांचं सूचक ट्विट
- Shivsena । खातेवाटपानंतर चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांची अवस्था केविलवाणी झालीय; शिवसेनेची खोचक टीका
- Shivsena । शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री. फडणवीस महोदय आहेत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

