Share

‘हे आंदोलन फक्त पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून महाराष्ट्रातील शेतकरीही पाठीशी खंबीरपणे उभा आहे’

Published On: 

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात दिल्ली सीमेकडे कूच करत आहेत.

तर, राज्यातील शेतकरी नेते देखील आक्रमक झाले असून हा कायदा अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योजकांच्या फायद्यांसाठी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेकाप आदी समविचारी शेतकरी संघटनांनी अंबानी-अदाणींच्या कार्यलयावर मोर्चा देखील काढला होता.

आता, गेल्या 28 दिवसांपासून दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेचे नेते रविकांत तुपकर आज कार्यकर्त्यांसह दिल्लीतील सिंघू व गाजीपुर बॉर्डरवर पोहचले आहेत. सिंघू बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांनी तुपकरांचे जोरदार स्वागत केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना रविकांत तुपकरांनी आपल्या तडाखेबाज शैलीत संबोधित केले.

सिंघू बॉर्डरवर अनेक युवकांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान यांना पत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. या युवकांचीही त्यांनी भेट घेतली. तसेच गाजीपुर बॉर्डरवर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची तुपकरांनी भेट घेतली व आंदोलनात सहभागी झाले. ‘हे आंदोलन फक्त पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून महाराष्ट्रातील शेतकरीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

‘शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तर केंद्र सरकारला महागात पडेल..सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर जर लवकरात-लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जथ्थेच्या-जथ्थे दिल्लीत दाखल होतील,’ असा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!