मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह काँग्रेसच्या १८ नगरसेवक, मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
भाजपमधील प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते, पदाधिकारी यांची देखील राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीने स्वतःचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाच खिंडार पाडलं आहे. यावर काँग्रेसने आता जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. ‘भिवंडी महापालिकेतील काही नगरसेवक हे केवळ तांत्रिक दृष्ट्या काँग्रेस पक्षात होते. महापौर निवडणुकीत पक्षादेशाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याप्रकरणी पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये त्यांच्यावरील कारवाई विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. काँग्रेस पक्ष याचा पाठपुरावा करत आहे.’ अशी माहिती त्यांनी दिली.
तर, ‘या नगरसेवकांनी काँग्रेसच्या विचार, धोरण व निर्देशांचे उल्लंघन केलेले आहे.अशा व्यक्तींना राज्य सरकारमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश देऊन दुर्दैवी पायंडा पाडलेला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे’ असा खुलासा देखील सचिन सावंत यांनी केला आहे.
या नगरसेवकांनी काँग्रेसच्या विचार, धोरण व निर्देशांचे उल्लंघन केलेले आहे.अशा व्यक्तींना राज्य सरकारमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश देऊन दुर्दैवी पायंडा पाडलेला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 24, 2020
दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश काल पार पडला होता.
महत्वाच्या बातम्या
- कोणताही कायदा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही; ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा दावा
- ‘मेटेंना सामान्य ज्ञान हवं; मागासवर्गीयांसाठी पुढाकार घेणं म्हणजे इतरांना विरोध असं नाही’
- सत्तासुंदरी हातातून गेल्याने भाजपच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे; शेट्टींचा पलटवार
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- ‘पवारांच्या बर्थ-डे पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा होते, मात्र कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

