Share

‘सदाभाऊ, साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा’

Published On: 

बीड : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व अन्य राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थन देण्यासाठी किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू झाली असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  सडकून टीका केली.

शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलंय. पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.

आता सदाभाऊंवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. ‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’ अशी बोचरी टीका बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!